शनिवार, १५ ऑक्टोबर, २०११

साठवणीतीळ आठवणी

पान नं १ पुढे पान नं२
१ई
- बाळा साहेबांना राजमाता अम्मामहाराजांच्या कृपेने १९२४ते१९३६ राजां जोर्ज जीवाजीरावां बरोबर मॆत्री एकत्र सरदार स्कूलमधे शिक्षण,सहवास व किल्ल्यावरच राहणे शक्य झाले,पर्यायाने चार्टर प्लेनने मुंबईच्या फ़ेर्‍या व त्यांचे बरोबर वास्तव्यास हाजीअलीसमोर वरळीला समुद्र्महाल राजांव्या आग्रहास्तव नाटके पाहणे सुरू झालेले असता एकदा नाटक बघण्यासाठी नाट्यगृहांत गेले असता एका सुंदर पारशी युवतीशी राजाने अविवेकपूर्ण वर्तन केले,त्यावरून ती युवती राजांना अद्वातद्वा बोलली.बाळाने राजाला प्लेनने ऊलटपावली ग्वाल्हेरला परतनेले अम्मामहाराजां ना जेव्हां कळले, परिणामी राजाच्या विवाहात अडचणी येऊन शेवटी नेपाळ्च्या राजघराण्यातील विजयाराजे यांच्याशी विवाह झाला.१फ़- राजे माधवरावांच्या कारकिर्दी पासूनच ईंग्रजांचे बस्तान व्यवस्थित बसलेले होते व राजांचे मेट्रिकचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हां अम्मामहाराजांचे शासनातून ईंग्रजांचा राजाला ग्वाल्हेर राज्याबाहेर पुढ्च्या शिक्षणासाठी पाठवण्याचा आग्रह सुरू झाला, शेवटी त्यांनी राजाला एकट्याला राज्याबाहेर शिक्षणासाठी न पाठविण्याचा निर्धार ईंग्रजांपुढे मांड्ला.परिणामी राजाबरोबर ५ सहपाठी १-बाळ आपटे २-बाळ जोशी ३-जोर्ज जीवाजीराव शिंदे ४- काकडे ५-महेंद्रसिंह(पहाडी) -ह्यावेळेस आठवत नांही. ह्या सगळ्यांना लायलपूर(फ़ाळ्णीनंतर पाकिस्तानात आहे)ला धाडले व बाळाला अम्मामहाराजांनी जाण्यापूर्वी वेगळे बोलावले व एक गोपनीय आदेश बाळाला दिला,"बाळ राजा तुझ्याबरोबरच जातात आहे,पण गंगाजळीतून तुझ्या सही शिवाय राजे १रूपया वापरू शकणार नांही व राजाचा दॆनिक नित्यक्रम,"रोजनामचा" माझ्याकडे आला पाहिजे," दोन दातांत जीभ असल्याप्रमाणे पुढे बाळ कात्रीत सापडल्यामुळे ६ नोव्हेंबर १९३६ राजांचा राज्याभिषेक व चारचदिवसानंतर १०नोव्हेंबर १९३६ ला बाळाच्या हिश्याचा वडिलोपार्जित वाडा व बाग सरदार अण्णासाहेबांच्या नांवे करून राजाने बाळाला देशोधडीला लावले..२अ- मूळ पुरूष नारो विष्णू यांना पेशव्यांनी ग्वाल्हेर स्टेट मधे पाठविल्यानंतर तीस ह्जारी जहागिर व समशेरजंगबहाद्दर पदवी तर मिळवलीच शिवाय राजे शिंदे यांच्या दरबारी ऊजवीकडे बसण्याचा मानपण मिळवला. त्यांव्याच जोडीतोडीने त्यांचा मोठा मुलगा हरी पण तेवढाच कर्तबगार,व हुशार निघाला.पुढे हरीप्रमाणे त्यांचा मुलगा गणेशपण त्याही पेक्षा हुशार निघाला म्हणून तत्कालीन राजमाता बायजाबाईंनी स्वखुशीने पुढाकार घेतला व मध्यस्त होऊन बाजीराव पेशव्यांची मुलगी सरस्वतीबाई ऊर्फ़ बयाबाईंचा विवाह गणेश हरींशी लावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा