बुधवार, १२ ऑक्टोबर, २०११

साठ्वणीतील आठवणी

-----
<<<साठवणीतील आठवणी>>>-----संस्थान द्त्तात्रय हरी ऊर्फ़ बाळासाहेब आपटे यांच्या१-मृत्युपूर्वीच्या २- ईतरच्या१अ- बाळासाहेब व जॊर्ज जिवाजीराव एकत्र ग्वाल्हेरच्या किल्ल्यावर सरदार स्कूल(सिंधिया स्कूल)मध्ये शिकत असताना सन १९२४ते१९३६जनरल राजवाडे यांनी राजांना एका विशेष समारंभाच्या ऊदघाट्नासाठी बोलाविले होते अचानकच त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने,बाळाला घोडा व निशाण देऊन राजवाडेंना निरोप देण्यासाठी पाठ्वले.जनरलांनी फ़क्त घोडा, निशाण बघून २१ तोफ़ांची सलामी बाळाला दिली व नंतर जेव्हां बाळाला प्रत्यक्ष पाहिले पण त्याचा कांहींच फ़ायदा नव्ह्ता.१ब- ग्वाल्हेर स्टेट्च्या परंपरेनुसार राजांची द्सर्‍याच्या दिवशी ह्त्तीवरून सोन्याच्या अंबारीतून मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक मोठ्या दिमाखात निघत असे त्यांच्या बरोबर जोडीने बसण्याचा, सहवासाचा,शिक्षणाचा सुखद अनुभव,सन १९२४ते१९३६पर्यंत लाभला परंतू पुढील शिक्षणासाठी जेव्हां ५ साथीदारांसह लायलपुरला पाठवण्यत आले तेव्हां अण्णासाहेबांना त्यांच्या अपरोक्ष राजांना उलटसुलट सांगून त्यांचे मन कलुशित करण्यास मनसोक्त वेळ व योग्य ती संधी मिळाली, परिणामी राजाला ६ नोव्हेंबर१९३६ला राज्याभिषेक व १०नोव्हेंबर१९३६ला बाळाला राहत्या वाड्यातून बेद्खल करण्यात आले..१क- राजे माधवरावांनंतर जेव्हां सत्ता गजराराजे ऊर्फ़ अम्मामहाराजांच्या हातांत आली त्यांना बाळाच्या घराण्या संबंधातील संपूर्ण ईतिहास माहित असल्याने त्यांनी बाळाला सर्वप्रथम ९व्या वर्षी सरदारस्कूल मधे राजा बरोबर सहपाठी शिक्षणासाठी ठेवले व त्यांनीच बाळाला बोलावून सांगितले,"बाळ हे चुलते तुझ्यासाठी काळ आहेत म्हणून त्यांना मी देश निकाला देत आहे." ही बातमी अण्णासाहेबांना कळ्ताक्षणी, बाळ बग्गीतून महालात जात असता,सकाळी शिंद्याच्या छावणीत नदी दरवाज्या जवळच बग्गीच्या घोड्याची रास धरून कोवळ्या बाळाकडून ग्वाल्हेरला राहूदेण्याचे अभयदान घेतल्यावर बग्गीची रास सोड्ली व नंतरच बाळ महालात जाऊ शकले. हीच घोड्चूक पुढे बाळासाठी काळ ठरली.१ड- राजाला शिकारीची आवड होती, एकदा शिवपुरीच्या जंगलात बरोबर बाळपण गेला असता एका ११-" लांब वाघाला हलकार्‍यांनी जेरबंद केले व जिवाजीरावांनी गोळी घातली पण ती चुकली,वाघाने राजावर झेप घेतली त्याचक्षणी बाळानी झाडलेल्या गोळीने वाघ मारला गेला.पण आजही ग्वाल्हेरच्या महालात वाघाला मसाला भरून ठेवलेला आहे. पण सत्य असे की जर बाळाची पण गोळी चुकली असती तर राजे कदाचित वाघाचे भक्ष होऊन स्वर्गवासी झाले असते. पुढे पान २ वर चालू

२ टिप्पण्या:

  1. पान नं १ पुढे पान नं२
    १ई- बाळा साहेबांना राजमाता अम्मामहाराजांच्या कृपेने १९२४ते१९३६ राजां जोर्ज जीवाजीरावां बरोबर मॆत्री एकत्र सरदार स्कूलमधे शिक्षण,सहवास व किल्ल्यावरच राहणे शक्य झाले,पर्यायाने चार्टर प्लेनने मुंबईच्या फ़ेर्‍या व त्यांचे बरोबर वास्तव्यास हाजीअलीसमोर वरळीला समुद्र्महाल राजांव्या आग्रहास्तव नाटके पाहणे सुरू झालेले असता एकदा नाटक बघण्यासाठी नाट्यगृहांत गेले असता एका सुंदर पारशी युवतीशी राजाने अविवेकपूर्ण वर्तन केले,त्यावरून ती युवती राजांना अद्वातद्वा बोलली.बाळाने राजाला प्लेनने ऊलटपावली ग्वाल्हेरला परतनेले अम्मामहाराजां ना जेव्हां कळले, परिणामी राजाच्या विवाहात अडचणी येऊन शेवटी नेपाळ्च्या राजघराण्यातील विजयाराजे यांच्याशी विवाह झाला.
    १फ़- राजे माधवरावांच्या कारकिर्दी पासूनच ईंग्रजांचे बस्तान व्यवस्थित बसलेले होते व राजांचे मेट्रिकचे शिक्षण पूर्ण झाले तेव्हां अम्मामहाराजांचे शासनातून ईंग्रजांचा राजाला ग्वाल्हेर राज्याबाहेर पुढ्च्या शिक्षणासाठी पाठवण्याचा आग्रह सुरू झाला, शेवटी त्यांनी राजाला एकट्याला राज्याबाहेर शिक्षणासाठी न पाठविण्याचा निर्धार ईंग्रजांपुढे मांड्ला.परिणामी राजाबरोबर ५ सहपाठी १-बाळ आपटे २-बाळ जोशी ३-जोर्ज जीवाजीराव शिंदे ४- काकडे ५-महेंद्रसिंह(पहाडी) ६-ह्यावेळेस आठवत नांही. ह्या सगळ्यांना लायलपूर(फ़ाळ्णीनंतर पाकिस्तानात आहे)ला धाडले व बाळाला अम्मामहाराजांनी जाण्यापूर्वी वेगळे बोलावले व एक गोपनीय आदेश बाळाला दिला,"बाळ राजा तुझ्याबरोबरच जातात आहे,पण गंगाजळीतून तुझ्या सही शिवाय राजे १रूपया वापरू शकणार नांही व राजाचा दॆनिक नित्यक्रम,"रोजनामचा" माझ्याकडे आला पाहिजे," दोन दातांत जीभ असल्याप्रमाणे पुढे बाळ कात्रीत सापडल्यामुळे ६ नोव्हेंबर १९३६ राजांचा राज्याभिषेक व चारचदिवसानंतर १०नोव्हेंबर १९३६ ला बाळाच्या हिश्याचा वडिलोपार्जित वाडा व बाग सरदार अण्णासाहेबांच्या नांवे करून राजाने बाळाला देशोधडीला लावले..
    २अ- मूळ पुरूष नारो विष्णू यांना पेशव्यांनी ग्वाल्हेर स्टेट मधे पाठविल्यानंतर तीस ह्जारी जहागिर व समशेरजंगबहाद्दर पदवी तर मिळवलीच शिवाय राजे शिंदे यांच्या दरबारी ऊजवीकडे बसण्याचा मानपण मिळवला. त्यांव्याच जोडीतोडीने त्यांचा मोठा मुलगा हरी पण तेवढाच कर्तबगार,व हुशार निघाला.पुढे हरीप्रमाणे त्यांचा मुलगा गणेशपण त्याही पेक्षा हुशार निघाला म्हणून तत्कालीन राजमाता बायजाबाईंनी स्वखुशीने पुढाकार घेतला व मध्यस्त होऊन बाजीराव पेशव्यांची मुलगी सरस्वतीबाई ऊर्फ़ बयाबाईंचा विवाह गणेश हरींशी लावला.

    उत्तर द्याहटवा
  2. पान नं २ पुढे पान नं३
    पुढे सन १८८८ मध्ये गणेश निपुत्रिक वारले म्हणून तत्कालीन राजे शिंदे यांनी गणेश कडे असलेली जहागिरदारी. चुलत बंधू( विठ्ठ्लचा) मुलगा गोपाळच्या नावे केली आणि गोपाळ्ला, वयाने मोठ्या दीराला बयाबाईंच्या मांडीवर बळजबरीने दत्तक देण्याचा घाट घातला जो की बयाबाईंनी नाकारला.पुढे सन १९०२मध्ये गोपाळरावही निपुत्रिक वारले पण राजांनी जहागिरदारी परत मोठ्या घरी दिली नांही शिवाय बयाबाईं यांनी दत्तक घेतलेल्या ९ वर्ष वयाच्या हरीचे दत्तविधान नामंजूर करून गोपाळरावांच्या पश्चात लक्ष्मीबाईंच्या मांडीवर दोन मुले बोटात, एक पोटात व बायकोसह देवासचे श्रीधर त्रिंबक यांचे दत्तविधान राजाने मंजूर केले एवढेच नांही तर जहागिरदारीवर दाखिल खारीज मंजूर करून वडिलोपार्जित वाडे व बागा पण दिल्या पुढे सन १९२५ मध्ये कॊंसिल आफ़ रीजन्सीच्या काळात आपटे घराण्याचा कारभार १-बाजीराव काटे २-रावराजे राजवाडे या दोन ट्र्स्टींच्या हातात सोपविण्यात आला,परिणामी आपट्यांची तीस ह्जारी जहागिरदार बदलून तीन ह्जारी व राजवाड्यांची तीन हजारी जहागिर,तीस ह्जारी झाली कशी, कां व कोणी केले हे कोडे कधीच ऊलगडले नाही.
    २ब- श्रीमती लीलावतींच्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना ग्वाल्हेरच्या जयारोग हास्पिटलात
    २५ जुलाई१९५८ला बाळ आपटेयांच्या मृत्यूनंतर अजून प्रेताभोवती लीलाबाईं व बाजूला चारी मुले ऊभी असताना (सरदार) अण्णासाहेब प्रवेशतात व बाईंना प्रश्न करतात," लीलाबाई तुम्हीतर मेट्रिक फ़ेल आहांत, पुढे कसे होईल?" हाच प्रश्न जर बाळाच्या श्राद्धानंतर घरी केला असता त्याला काळजीपोटी विचारले असा अर्थ निघू शकला असता पण त्या हृदयविदारक क्षणी ६२ वर्ष ऊतार वयाच्या आप्त गृहस्थाच्या तोंडून फ़ारच दाहक वाट्ला.व जन्मभर आठवणीत राहिला.
    २क- बाळासाहेबांनी सन १९५६मधे पेशवा वंशज म्हणून केन्द्र सरकारला अर्ज दिला त्याअधी अण्णासाहेबांनी "लोकसत्ता" मधे एक लेखात "बयाबाई त्यांच्या मांडीवर डोके ठेऊन मेल्या." छापविले. त्यावर त्यांच्या पुतण्याने त्यांना चार जणांसमोर प्रश्न विचारला,"काका तुम्ही एक,दोन,का तीन घरचे? कारण द्त्तविधानापूर्वी देवासचे,द्त्तविधानांतून नांव नसताना नंतर वडिलांबरोबर येऊन आमचे काका (चुलत)झालांत व आता पॆश्यासाठी बयाबाईंच्या घराण्यात येण्याची तॆयारी आहे?न्यायव्यवस्थे प्रमाणे द्त्तविधाना नंतर आर्थात चॊथा भाऊ दामोदर यांचा
    जन्म झाला,त्याचा आर्थात खर्या ह्कदाराचा ह्क्क मारून सोईस्कर रीत्या वेळेअंती साम,दाम वापरून आपट्यांच्या सगळ्या जायदादेसह तीन्ही मंदिर-ऊज्जॆन,बनारस व नेपाळच्या वाड्यासकट एकट्याने पॆसा वसूल केला व ढेकरही न देता मॊकळे झाले.
    २ड- श्रीमती लीलावतीने पश्चात चारी अपत्यांना व आपल्याला योग्य पदवीधर शिक्षण देऊन सन्मार्गीतर लावलेच शिवाय बाळासाहेबांची परिवार पेन्शन व १९७१पासून पेशवांची स्वतंत्रता सेनानी पेन्शन आणि चार हजार पुरूषात ए.जी. आफ़िसात ईतिहासातील पहिली महिला ५-१२-१९५९पासून ३१-३-१९८४ ला रिटायर होऊन तिसरी आपली पेन्शन त्यांच्या १९-१०-२००९ पर्यंत ऊपभोगल्या. .

    उत्तर द्याहटवा